Sunday, August 9, 2009

इंटरनेट एक अनुभव

आशु अरे ये नारे जेवायला....आणि अभ्यास नसतो का तुला....आजकाल दिवसभर तू कंप्यूटर वर असतोस....असा दिवसातून सतारान्दा जप करणारी मी आज किती बदलली....

इंटरनेट सरफिंग,गटॉक काही काही माहीत नसलेली मी किती दूर होते या दुनियेपासून.....पण माझा स्वभावच नवीन नवीन शिकण्याचा...प्रत्येक गोष्टीचे कुतूहल...आणि मग मागे लागून लागून शेवटी मी पण शिकलेच थोडे फार.....मग काय मेल चेक करने गटॉक ओरकुत सर्व सर्व समजू लागले.....ओरकूट आकाउंट उघडले आणि अचानक हे जग किती मोठे आहे याची जाणीव झाली. इतक्या वर्षात माझ्या मीपणात रमलेली मी, माझे घर, माझी फॅमिली याशिवाय कशाचा विचार न करणारी मी आत्ता कधी एकदा जेवण बनवते सर्व कामे मार्गी लावते आणि लोग इन करते असे होऊ लागलाय.

ओरकूट आकाउंट उघडले आणि जुने नवीन मित्र मैत्रिणी भेटले...नवीन नवीन कम्यूनिटीस जॉइन करण्यात वेगळाच आनंद मिळत होता...मुख्य म्हणजे ज्या मराठी पासून मी इतके दूर होते ती अचानक जवळ आल्याचा आननद मिळत होता ....अशातच 2,3 मित्र मैत्रिणी जीवभावाचे झाले इंडोरच्याच मैत्रिनिभेटल्या...रोज नवीन संवाद, थट्टा मस्करी, राग रूसवे या सर्वात मी इतके गुंतले की नेट फ्रेंड्स जणू माझे बालमित्र असावेत असे नाते जुळले. ना वयाचा ना पैशाचा ना व्यक्‍तिगत स्पर्धा...अशा या विश्वात मी या सर्वाना हृदयातून आपले मानले.

पण....काय माहीत होते....असाही दिवस कधी येईल....ज्या मित्राला आपणा इतके दिवस आपला जिवाभावाचा मानत होतो...तो अत्यंत साध्या सरळ शब्दात मला सांगून जातो.....आपली मैत्री आत्ता इथेच संपली.....क्षणभर वाटले हेकाय....थट्टा तर नाही करत....पण क्षणात सर्व सर्व संपलेले...काय झाले असे.........डोळ्यात पाणी तरळात होते...स्क्रीन वरचे काहीच दिसेनासे झाले गालावर ओघळणारे ते अश्रू पुसट मी झटकन लोग आउट झाले
अरे काय झाल मला इतकी कशी गुंतले मी????? परत एकदा लहान झालेली मी खाडकन जागी झाली. डोक्यात लक्ख प्रकाश पडला...ही दुनियाच खोटी कोणी कोणी खरे नाही इथे .....कोणावर विशवास ठेवायचा ? मग माझया सारख्या एका सध्या स्त्रीचा इथे काय निकाल लागणार?

पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच इथे ही माझ्या अशाच एका मित्राचे आणि माझे नाते अटूत...कधीच न विसरता येणारे . ज्याच्यामुळे आज मी हा ब्लॉग बनवला ...त्याच्यामुळे आज मी किती तरी गोष्टी शिकले....खर तर माझ्या मुलासारखा....आमच्या मैत्रीच नाते इतके घट्ट जुळलय ...मैत्री ही सांगून होत नसते...तिला वयाची मर्यादा नसते जिथे मन जुळत विचार जुळतात,आपलेपणा वाढतो तिथेच ही मैत्री टिकून राहते...ह्या माझया मित्राने मला गाणी डाउनलोड करणे नवीन साइट्स नवीन ब्लॉग्स खूप काही नवीन वाचन मेल द्वारे मला दिले....आमची दर शनिवार रविवारची गाण्याची महफील.....कधीच आयुष्यात विसरणे शक्य नाही.

आज ही माझ्या त्या सोडून गेलेल्या मित्राची मी वाट पाहते आहे कधिन कधी पुन्हा एकदा परत येईल कधी तरी त्याला खर्या मैत्रीची किंमत समजेल या आशेवर आज ही मी आहे....

आयुष्यात खरतर खूप गोष्टी घडत असतात . लोकांच्या दृष्टीनी ही फारच शुल्लक गोष्ट असु शकते....पण आपला जसा मैत्रीकडे बघण्याचा दृष्टी कोण असतो त्यावर हे अवलंबुन असते....

ईश्वर चरणी माझी एकच प्रार्थना यापुढे कधीही माझ्या आणि माझ्या या दुसर्‍या दोस्ताच्या मैत्रीत कधीच अंतर न येवो...

आठवन

आज परत एकदा खुप एकटे वाटतय ...जिवाला हुरहुर लागली आहे .....आकाशात daatun आलेले ढग मनात काहूर mandat होते ......विविध भारतिवर लागलेले गाण्या चे स्वर कानापर्यंत पोचतात न पोचतात तोच फोन वाजला
हेल्लो शुभी का ? आहेस कुठे ? आवाजाचा अंदाज आला ..माझी च एक जिवाभावाची मैत्रिण बोलत होती ...माझे एक urgent काम आहे ..चलशील का माझ्या बरोबर .अग्ग हो हो ... कुठे हे तर बोल ?...पत्रिका दाखवायची आहे ग ...
का काय झाले आता? काही नाही ग विशेष... रोजचच ....पण घर कधी बनेल आमचे हेच विचारायचे आहे मला ...सगळे आहे बघ पण याना कधी समजणार माझ्या इच्छा .....घरच तर घ्या नविन mhananari haमाझी मैत्रिण ....काय चुक होती तिची ?

एखाद वर्षाच्या अंतराने लग्न करून आलेल्या आम्ही दोघी मैत्रिणी...अहमदाबाद aसोडून आलेली ती आणि मी ..आमचे सुख दुक्ख शेयर करत असू ..खरा तर आमच्या दोघिंचे नवरे मित्र पण आम्हा दोघिंचे नाते जास्त जुलले ..लग्ना नंतर प्रत्येक मुलगी स्वप्न सम्भालुन सासरी येते ..सर्वच स्वप्ने पुरी होतात असेही नाही पण जर आपल्या हातात असेल तर का करू नये?

माझ्या मैत्रिनिचे असेच काही से ...सासरचा वादिलोपर्जित वाडा...प्रशस्त पण कालच्या ओघाने वाड्याची अवस्था खंगत चाललेली ..जून ते सोने म्हानानारे आपण अशा modkalis आलेल्या wadya तुन बाहेर padanyaas इच्छा असुनही न धजनारा तिचा नवरा ... दर वर्षी पावसल्यत होणारी वाड्याची दुर्दशा बघवत नव्हती ...आणि यामुले एकत्र kutumbat उठानारे वादळ.......या सर्वा चा कोणाच्या मनावर काय परिणाम होइल सांगू शकत नाही

अ़ग चल लवकर कानावर नवरयाचा आवाज पडला अणि मी भानावर आले ...हॉस्पिटल मध्ये जायचे आहे न् ....जास्त विचार करून डोके दुखिच्या त्रास सुरु जालेली माझी मैत्रिण हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये मृत्युशी zagadat होती ......ब्रेन hamarage dr चे शब्द ....भावोजी असे कसे झाले...पुरते शब्द बाहेर पडलेच नाहीत ...१५ दिवसात २ ऑपरेशन्स ...बघवत नवते तिला आणि शेवटी कालाने खेचून नेलेली माझी मैत्रिण ..मागे २ लहान मुले सोडून
सर्व कसे चित्रपट सारखे नजरे समोरून गेले ....आज या गोष्टीला १ वर्ष झाले

आजच्या या धका धकिच्या जीवनात आपण इतके busy असतो पैसा कमावतो ..पण आयुष्य भरसठी सोबत आणलेल्या सहचारिणी साठी थोड़े फार काही करू शकलो तर जरुर बघा ....

कुणी सांगितले उद्याचा दिवस कसा उजाडतो?